PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 23, 2024   

PostImage

पाडवा गोड झाला


 

मर्यादा पुरुषोत्तमाची काल प्राणप्रतिष्ठेचा मोठा वाजत गाजत व मोठ्या भक्ती भावाने अयोध्या नगरीत पार पडला.भाविकांना रामलल्ला चे दर्शन घेता यावे,म्हणून भक्तांसाठी मंदिर खुला केल्या गेला,म्हणजे पाडवा गोड झाला,असंच म्हणावं लागेल.

22 जानेवारी रोजी अयोध्या नगरीत प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या आनंदाने अन भक्तीभावाने आनंदी उत्सवात साजरा करण्यात आला.

संपूर्ण भारत देशासोबतच परदेशात सुद्धा मोठा खुशी माहोल म्हणजे आनंदाची दिवाळी साजरी केल्या गेली. प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा म्हणजे आनंद द्विगुणीत होणारच,यात काही शंका नाही.

अयोध्या नगरीत काल आमंत्रित निमंत्रित 8000 पाहुण्यांसोबतच अनेक श्री रामप्रभू चे भक्त रामनगरीत प्रवेश केले होते.काल झालेल्या कार्यक्रमाला जरी उपस्थित राहता नाही आलं असेल तरी परंतु भाविकांना श्री रामप्रभू चे दर्शन घेता यावे,यासाठी भक्तांना आजपासून राम दरबार भाविकांसाठी खुले करण्यात आले. आणि मर्यादा पुरुषोत्तमाचे दर्शन घेऊन स्वतःला धन्य समजत भक्तीभावाने पूजा अर्चा केल्या गेली.

ज्या भाविकांनी आज श्रीराम प्रभू चे दर्शन घेतले त्यांनी स्वतःला धन्य समजत,काल जरी दर्शन घेता आले नाही तरीपण आज दर्शन घेऊन आनंद साजरा केला आणि श्रीराम प्रभू चे दर्शन घेतल्यानंतर पाडवा गोड झाला, अशी प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केली.

22 जानेवारी हा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिल्या जावा,अशी आशा व्यक्त करून संपूर्ण भारतवासी प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमात तन-मन-धनाने आपली शब्दरूपी उपस्थिती दर्शवली,हे कालच्या आनंदावरून दिसून आले.

 

आणखी वाचा : प्रभू आले मंदिरी

श्रीराम प्रभूची प्राणप्रतिष्ठा अयोध्या नगरीत पार पडली पण देशातील प्रत्येक गावागावात आनंदाची दिवाळी म्हणून साजरी केल्या गेली.अंगणात सडा टाकून रांगोळी काढण्यात आली नंतर मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात रामभक्तित नागरिक तल्लीन होऊन गेले होते.

माय माऊलीच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण झळकत होते.म्हणजे संपूर्ण भारतात जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद साजरा करून मर्यादा पुरुषोत्तमा कडून आशीर्वाद मागून घेत होते.म्हणजे विचार न केलेला बरा,एवढा आनंद व्यक्त केला जात होता.

 


PostImage

Sangitabodele

Jan. 15, 2024   

PostImage

Shri Ram Mandir Ayodhya : रामलला की प्राण प्रतिष्ठा के …


AYODHYA : विश्व हिंदू फाउंडेशन के संस्थापक (Founder of Vishwa Hindu Foundation) और वैश्विक अध्यक्ष स्वामी विज्ञानानंद (Global President Swami Vigyanananda) ने रविवार को कहा कि 22 जनवरी को अयोध्या में राम मंदिर में 'प्राण प्रतिष्ठा' समारोह ('Pran Pratistha' ceremony in Ram temple) में राजदूतों और सांसदों सहित 55 देशों के लगभग 100 प्रमुखों को आमंत्रित invited किया गया है। “राजदूतों और सांसदों सहित 55 देशों के लगभग 100 प्रमुख राम लला प्राण प्रतिष्ठा के साक्षी बनेंगे। स्वामी विज्ञानानंद ने कहा, हमने कोरियाई रानी को भी आमंत्रित किया है, जो प्रभु श्री राम वंशज होने का दावा करती हैं।

जिन देशों को आमंत्रित किया गया है उनमें अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, बेलारूस, बोत्सवाना, कनाडा, कोलंबिया, डेनमार्क, डोमिनिका, डीआरसी, मिस्र, इथियोपिया, फिजी, फिनलैंड, फ्रांस, जर्मनी, घाना, गुयाना, हांगकांग, हंगरी, इंडोनेशिया, आयरलैंड शामिल हैं। इटली, जमैका, जापान, केन्या, कोरिया, मलेशिया, मलावी, मॉरीशस, मैक्सिको, म्यांमार, नीदरलैंड, न्यूजीलैंड, नाइजीरिया, नॉर्वे, सिएरा लियोन, सिंगापुर, दक्षिण अफ्रीका, स्पेन, श्रीलंका, सूरीनाम, स्वीडन, ताइवान, तंजानिया, थाईलैंड, त्रिनिदाद और टोबैगो, 

The countries that have been invited include Argentina  Australia Belarus Botswana Canada Colombia Denmark Dominica DRC Egypt Ethiopia Fiji Finland France Germany Ghana Guyana Hong Kong Hungary Indonesia Ireland Are Italy Jamaica, Japan Kenya Korea Malaysia Malawi  Mauritius Mexico Myanmar Netherlands New Zealand Nigeria Norway Sierra Leone Singapore South Africa Spain Sri Lanka Suriname Sweden Taiwan Tanzania Thailand Trinidad and Tobago West Indies Uganda UK USA Vietnam and Zambia
 
संगठन के अंतरराष्ट्रीय मामलों को संभालने वाले वीएचपी के संयुक्त महासचिव स्वामी विज्ञानानंद के अनुसार, देश के प्रमुख राम मंदिर कार्यक्रम में भाग लेंगे। स्वामी विज्ञानानंद ने आगे कहा कि सभी वीवीआईपी विदेशी प्रतिनिधि 20 जनवरी को लखनऊ पहुंचेंगे; इसके बाद 21 जनवरी को शाम तक वे अयोध्या पहुंचेंगे. उन्होंने कहा, "कोहरे और मौसम की स्थिति के कारण, प्रतिनिधियों से कार्यक्रम से पहले भारत आने का अनुरोध किया गया है।" स्वामी विज्ञानानंद ने पहले कहा था कि उन्होंने अधिक विदेशी मेहमानों को आमंत्रित करने की योजना बनाई थी लेकिन जगह छोटी होने के कारण उन्हें मेहमानों की सूची में कटौती करनी पड़ी। भव्य मंदिर के उद्घाटन के लिए तैयारियां जोरों पर चल रही हैं, जिसमें गणमान्य व्यक्ति और सभी क्षेत्रों के लोग शामिल होंगे।

👉 ऐसी जानकारी जानने के लिए व्हाट्सएप ग्रुप से जुड़ने के लिए यहां क्लिक करें 👈


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Jan. 5, 2024   

PostImage

राम नामाचा उदो-उदो


500 हून अधिक वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर, आता अखेर आपल्या श्री रामांचे अयोध्येत राम मंदिर बनते आहे. कायदेशीर आणि राजकीय लढाई नंतर राम मंदिर अखेर पूर्णत्वास येते आहे. न भूतो न भविष्यती असे नागर शैलीतील राम मंदिर पुढील 800 ते 1000 वर्षांपर्यंत टिकणार आहे. देशातील इतर प्राचीन मंदिरांचा अभ्यास करून त्या प्रकारे राम मंदिर बांधले जात आहे. 

कोणार्क मंदिराप्रमाणे राम मंदिराची रचना असणार आहे, कोणत्याही स्वरूपाचं स्टील अथवा सिमेंट मंदिराच्या बांधकामात वापरले गेले नाही.राम मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे ठीक दुपारी 12 वाजता प्रभू श्री रामांच्या चरणावर सूर्याची किरणे पडतील असे तंत्रज्ञान वापरले गेले आहे.

  • राम मंदिर हे नागर शैलीत बांधले आहे.
  • मंदिराची पूर्व पश्चिम लांबी 380 फूट आणि रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट आहे.
  • मंदिर 3 मजली आहे, प्रत्येक मजला 20 फुटांचा आहे. 
  • मंदिराला 392 खांब आणि 44 दरवाजे आहेत.
  • भूतल गर्भगृहात प्रभू श्रीरामांची बालमुर्ती स्थित आहे, प्रथमतल गर्भगृहात श्रीराम दरबार आहे.
    नृत्य मंडप, रंग मंडप, गूढ मंडप (सभा मंडप), प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे एकूण 5 मंडप आहेत.
    खांबावर तसेच भिंतीवर विविध देवीदेवतांचे तसेच देवांगणांच्या मुर्त्या आहेत.
  • मंदिरात 32 पायऱ्या चढून (16.5 फूट उंच) पूर्व दिशेच्या सिंहद्वारातून प्रवेश होईल.
  • दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प तसेच लिफ्टची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
  • मंदिराच्या चहूबाजूस आयताकृती प्राकार आहे, त्याची लांबी 732 मीटर आणि रुंदी 4.25 मीटर आहे.
  • प्राकाराच्या चारही कोपऱ्यात चार मंदिरे आहेत. त्यामध्ये भगवान सूर्य, भगवान शंकर, गणपती, देवी भागवती तसेच दक्षिण बाजूस प्रभू श्री हनुमान आणि उत्तरेस अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे.
  • राम मंदिराजवळ पौराणिक काळातील सिताकुप आहे.
  • श्रीराम मंदिर परिसरात महर्षी वाल्मिकी, महर्षी वसिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्ती, निषदराज गुह, माता शबरी आणि देवी अहिल्या माता यांची मंदिरे प्रस्तावित आहेत. (पुढील काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल)
  • सोबतच मंदिराच्या नैऋत्य भागातील नवरत्न कुबेर टीला येथील शिवमंदिराचा जीर्णोद्धार तसेच रामभक्त श्री जटायू यांची स्थापना देखील करण्यात येणार आहे.

राम मंदिराचा मुद्दा हा लोकांच्या आशेचा मुद्दा होवून गेलाय आणि करोडो भाविक आजपासूनच राम नामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेलाय,असं म्हणायला काहीच हरकत नाही. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा जयजयकार करत अवघा भारत देश दुमदुमून गेलाय,इतका भक्तिमय वातावरण देशाच्या गल्लो-गल्लीत निनादत असेल तर श्रीरामाच्या अयोध्येत कसं वातावरण असेल. 

२२ जानेवारी देशाच्या इतिहासातील महत्वाचा दिवसांपैकी हा एक दिवस म्हणजे अवघा रंग एक झाला,याची प्रचिती आल्यावाचून राहणार नाही. या दिवशी देशात दिवाळी साजरी होणार,यात काही शंका नाही. इतका भक्तिमय वातावरण देशात निर्माण होत आहे. हा दिवस म्हणजे आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस आहे आणि संपूर्ण देश तयारीला लागला आहे. रामनामची धुन जरी कानावर एकू आली तरी मन तल्लीन होवून जातं आणि प्रत्यक्षात अयोध्येला जावून जर रामनामाच्या जपात सामील झालो तर आनंद गगनात मावेनासा होईल.